Translate

दोनच प्रकारात होणार जमिनीची मोजणी / sarkari jamin mojani / सरकारी मोजणी / भूमि अभिलेख मोजणी

दोनच प्रकारात होणार जमिनीची मोजणी / arkari jamin mojani / सरकारी मोजणी / भूमि अभिलेख मोजणी
sarkari jamin mojani



१ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी : मोजणीचे जुने नियम रद्द : भूमी अभिलेख विभागाचा निर्णय

गुंतागुंतीची प्रक्रिया रद्द.. आली सुलभता...
राज्यात जमीन मोजणीसाठी लागणारा वेळ कमी होऊन जलद मोजणी होणार आहे. 
मोजणीचे प्रकार दोनच आहेत. कोणतीही प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत. मोजणीची गुंतागुंतीची प्रक्रिया रद्द होऊन सुलभता येणार आहे. शिवाजीराव भोसले, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, कोल्हापूर



राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने जमीन मोजणीचे जुने नियम रद्द करत जमीन मोजणीच्या प्रकारामध्ये सुटसुटीतपणा आणला आहे. शुल्कात सुसूत्रता आणली आहे. 
यांची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून होणार आहे.

भूमी अभिलेख विभागाने जमीन मोजणी दर आणि मोजणीच्या प्रकारामध्ये सुसूत्रता आणली आहे. 
यापूर्वी सिटी सर्व्हे आणि सर्व्हे नंबर यासाठी जमीन मोजणीची फी वेगवेगळी आकारली जात होती. 
नवीन आदेशानुसार फक्त ग्रामीण भाग आणि पालिका हद्द असे दोन प्रकार करण्यात आले आहेत. नियमितमोजणी, तातडीची, अति तातडीची आणि अति अति तातडीची मोजणीचे असे प्रकार होते.
 हे सर्व प्रकार बंद करून नवीन आदेशानुसार नियमित आणि द्रुतगती (अतिजलद) असे दोनच प्रकार मोजणीसाठी निश्चित केले आहेत. 
शासनाच्या प्रशासकीय खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने मोजणी फी वाढ करणे आवश्यक होते. 
मोजणी प्रकार आणि कालावधीमध्ये विविध प्रकार निर्माण झाल्यामुळे जमीनधारकांमध्ये
व गावठाणधारकांमध्ये संभ्रम निर्माण होत असे. त्यामध्ये सुलभीकरण करणे आवश्यक होते.
 याचा विचार करून भूमी अभिलेख विभागाने नव्याने मोजणी फी आणि कालावधी निश्चित केला आहे. 
याबाबतचे आदेश भूमी अभिलेखचे उपसंचालक कमलाकर हट्टेकर यांनी नुकतेच दिले आहेत.

मोजणी कालावधी


नियमित मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर सुमारे ९० दिवसांत मोजणी करण्यात येईल. द्रुतगती मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर 30 दिवसांत मोजणी करण्यात येणार आहे.
महापालिका, नगरपरिषद हद्दीतील दर एक सर्व्हे नंबर, गट नंबर, पोट हिस्सा, सिटी सर्व्हे आदीमधील एका भूखंडासाठी एक हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी ३ हजार रुपये तर द्रुतगती मोजणीसाठी १२ हजार रुपये इतकी मोजणी फी ठरवण्यात आलेली आहे.

ग्रामीण भागातील मोजणी दर


एक सर्व्हे नंबर, गट नंबर, पोट हिस्सा, सिटी सर्व्हे आदीमधील एका भूखंडासाठी दोन हेक्टरपर्यत नियमित मोजणीसाठी २ हजार रुपये तर द्रुतगती मोजणीसाठी ८ हजार रुपये इतकी मोजणी फी ठरवली आहे.



एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.